गडचिरोली : जागतिक सायकल दिनानिमित्त 3 जून रोजी सायकलस्नेही मंडळाच्या वतीने इंदिरा गांधी चौकातून काढण्यात आलेल्या रॅलीत विविध वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सायकल चालवा, निरोगी राहा आणि पर्यावरण वाचवा, असे आवाहन या रॅलीतून करण्यात आले. (सविस्तर बातमी खाली वाचा)

गडचिरोलीतील पहिले सायकल डिलर कमलेश पटेल यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ केला. ही रॅली कारगिल चौक, आय.टी.आय चौक, जिल्हा रुग्णालय, टी-पॅाईन्ट, जिल्हाधिकारी कार्यालय, स्मृती उद्यान, एल.आय.सी.चौक, पुन्हा आय.टी.आय. चौक आणि रेस्ट हाऊस अशी शिस्तबध्द पद्धतीने काढण्यात आली. या रॅलीत शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच इतरही ज्येष्ठ सायकलस्नेही सहभागी झाले होते. सकाळी ७ वाजता रॅलीचा समारोप झाला.
यावेळी प्रामुख्याने मनोहर निखाडे, आयोजक उदय धकाते, प्रा.विलास पारखी, झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे, प्राचार्य सुचिता कामडी, प्रा.सुनिता साळवे, योगिता दशमुखे, मिरा बिसेन-चौधरी, केशव दशमुखे, विजयराव साळवे, प्रा.देवानंद कामडी, मुख्याध्यापक मनोज कवठे, प्रा.ज्ञानेश्वर धकाते, प्रा.शेखर गडसुलवार, प्रा.विजय कुतरमारे, प्रा.सोनवने, प्रा.ठाकरे, पुरुषोत्तम ठाकरे, प्रा.आखाडे, प्रा.अनिल शेट्ये, प्रा.अरूण पालारपवार, प्रा.हिवरकर, छबुताई राऊत , तनुजा राऊत, माधुरी बोरकर आदी सायकलस्नेही हजर होते. समारोपस्थळी सहभागी सायकलस्नेहींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.