बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडचिरोलीत रक्तदानासह विविध कार्यक्रम

खा.किरसान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गडचिरोली : माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा निर्मितीचे शिल्पकार स्व.बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. संध्याकाळी झालेल्या सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित खा.डॅा.नामदेव किरसान यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळी धानोरा मार्गावरील बाबुरावजी मडावी चौकातील त्यांच्या प्रतिमेला डॅा.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष घनश्याम मडावी, गुलाब मडावी,अमरसिंग गेडाम, माधवराव गावळ, फरेंद्र कुतीरकर, देवराव आलाम, विठ्ठल गेडाम, गंगाधर मडावी, सदानंद ताराम, उमेश उईके, प्रकाश ताकसांडे, भरत येरमे, कैलास मडावी, जयश्री येरमे, मलता पुडो, मनिषा मडावी, वर्षा शेडमाके, अन्नपूर्णा सिडाम यांच्यासह कै.बाबुरावजी मडावी स्मारक समिती, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॅाईज फेडरेशन, विदर्भ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी राष्ट्रीय युवा एकता परिषद, अ.भा.आदिवासी युवा परिषद, क्रांतीवीर नारायणसिंह उईके संघर्ष समिती, आदिवासी हलबा हलबी समाज संघटना, ट्रायबल डॅाक्टर्स असोसिएशन, नारीशक्ती महिला संघटना आदींचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जंगल कामगार सहकारी संस्था गडचिरोलीच्या सभागृहात कै.बाबुरावजी मडावी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात 33 पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.

सायंकाळी गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत खा.डॅा.नामदेव किरसान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सायंकाळी सुप्रभात मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॅा.नामदेव किरसान यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, रोहिदास राऊत, वामनराव सावसाकडे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.