दीपोत्सवाने उजळून निघाले आलापल्लीतील श्रीराम मंदिर

दिव्यांची आकर्षक आरास

आलापल्ली : येथील श्रीराम मंदिरात राष्ट्र सेवा समिती तथा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

त्यानिमित्ताने मंदिर परिसरात केलेल्या आकर्षण दिव्यांच्या आरासने मंदिराचा संपूर्ण परिसर उजळून निघाला. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी भाविकांनी सामुहिक हनुमान चालिसा पठण करून आरती केली. याशिवाय श्रीरामाचा जयघोष करत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी दिव्यांमधून शुभ दीपावली साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आले. महिलावर्गाने या दीपोत्सवासाठी विशेष मेहनत घेतली. (अधिक बातमी खाली वाचा)

आलापल्लीमधील सर्व श्रीराम भक्तांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मंदिराचा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून काढण्यासाठी हातभार लावला. (अधिक बातमी खाली वाचा)

आज लक्ष्मीपूजनालाही गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये संध्याकाळी दिव्यांची आरास केली जाणार आहे.