गडचिरोली : पुणे येथे नाम फाउंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात 50 शेतकरी, सरपंच, उपसरपंच, मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चमुने सहभाग घेतला. यावेळी नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांची मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी यांनी भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य व सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने आदिवासी समाजामध्ये परंपरागत रूढी असलेल्या “कुर्माघर” संदर्भात नाम फाउंडेशनने जनजागृती करण्याची विनंती करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर, विशेष करून आदिवासी महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. यावेळी नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना गडचिरोली जिल्ह्यात येण्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले.
मानवाधिकार संघटनेच्या उपाध्यक्ष पौर्णिमा विश्वास, संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक देवानंद पाटील खुणे, सरपंच गोपाल पाटील उईके, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, राकेश खुणे, पुरुषोत्तम गोबाडे, नितेश खुणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, जिल्हा सचिव प्रकाश थुल, गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, उपाध्यक्ष किशोर देवतळे, सचिव संतोष बुरांडे, दिनेश मुजुमदार, विलास वडेट्टीवार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुपाली कावळे, पुष्पा करकाडे, पूनम हेमके, विशाखा सिंह, लीना विस्वास, शिवशंकर मडावी, सतीश कोवे, लक्ष्मण उईके, विलास मडावी, प्रभाकर कुमोटी व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

































