Home दैनंदिन बातम्या बौध्द धम्माशिवाय जगाला सुख, शांतीचा पर्याय नाही- भन्ते प्रज्ञानंद

बौध्द धम्माशिवाय जगाला सुख, शांतीचा पर्याय नाही- भन्ते प्रज्ञानंद

अंतरजी येथे बौद्ध धम्म परिषद

आरमोरी : बौद्ध धम्माशिवाय जगाला सुख शांती मिळणार नाही, जगाचा उद्धार बुद्ध धम्मानेच होईल. कारण आज युध्द नको बुद्ध हवे, तरच जगात शांती नांदु शकते, असे मार्गदर्शन भन्ते प्रज्ञानंद महाथेरो यांनी अंतरजी येथील बौध्द धम्म परिषदेप्रसंगी केले.

आरमोरी तालुक्यातील अंतरजी (जोगीसाखरा) येथील शाक्यमुनी फॉरेस्ट मॅनेस्ट्री येथे धम्म परिषद पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटक भन्ते प्रज्ञानंद महाथेरो यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भिक्खु सचक महाथेरो, भन्ते नंद भदन्त शाक्यजोती (बुद्धगया), भन्ते कश्यप्प (संभाजीनगर), भन्ते विनालाचंत (ब्रम्हपुरी) कुणाल किर्ती (सावंगी), भन्ते महामोगलायन (सावंगी) भन्ते सोन पहाडी, भन्ते सुमेरा सावंगी, भन्ते महान्ताम सावंगी, भिक्खुनी सुमेधा सावंगी आदि 40 भिक्खूंसह डॉ.राजकुमार शेंन्डे, प्रा.मुनिश्वर बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

भन्ते प्रज्ञानंद पुढे म्हणाले की, भारतामधे नष्ट झालेला बौद्ध धम्म डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जिवित केला, म्हणूनच भारतामधे मोठ्या प्रमाणात विहाराची निर्मीती होत आहे आणि म्हणून धम्म वाढविणे गरजेचे आहे. याप्रसंगी डॉ.राजकुमार शेंन्डे, धम्मबंधु मुनिश्वर बोरकर यांची धमाप्रती समायोचित भाषणे झाली. दिवाकर रामटेके, आरमोरी यांनी अडीच एकर जमीन दान केली. त्यामुळे त्यांचा भन्तेजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भन्ते सारी पुत यांनी तर संचलन गुणवंत डोर्लीकर आणि आभार भिमराव मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमास समता सैनिक दलाचे मुत्ताजी दुर्गे, पुरुषोतम भैसारे, देवाजी भैसारे, प्रा.सहारे, प्रज्ञा निमगडे, शालीनी सुखदेवे, राजेंद्र गेडाम, मनोज दामले, लता रामटेके, ताराचंद बन्सोड, रोशन रामटेके, संघमित्रा राजवाडे, डॉ.उज्चला शेंन्डे, लता रामटेके, लता भैसारे, लता सहारे, विलाशिनी राऊत यांच्यासह बहुसंख्य उपासक-उपासिका उपस्थित होते.