गडचिरोली : बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी निघालेली धम्मध्वज यात्रा आज, दि.19 सप्टेंबर रोजी गडचिरोलीत येणार आहे. सायंकाळी 4 वाजता इंदिरा गांधी चौकातील राजीव भवनमध्ये ही जनसंवाद धम्म ध्वज यात्रा पोहोचणार आहे.

सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांचा प्रबोधनात्मक भिम गितांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर धम्म ध्वज यात्रेला येणारे भंते रेवत संघनायक भारत, भंते ज्ञानज्योती महाथेरो, भदंत हर्षबोधी महास्थवीर, भंते अशोक लामा, भंते विनाचार्य , भन्ते महामोग्गलायन, बुद्धज्योती, एस .वर्धन भंते, भंतेविमलचित, भंते कुणाल किर्ती इत्यादिचे प्रबोधन होणार आहे.
या यात्रेच्या आयोजनासाठी प्रा.मुनिश्वर बोरकर, ॲड .विनय बांबोळे, गोपाल रायपूरे, नितीन गजभिये, पंडित मेश्राम, भोजराज कान्हेकर, ॲड.शांताराम उंदिरवाडे, दशरथ साखरे, सुशिला भगत, मारोती भैसारे, विशाल दहिवले, प्रमोद राऊत, मुर्लीधर भानारकर इत्यादींनी पुढाकार घेतला आहे. या प्रबोधनाचा लाभ गडचिरोली जिल्हयातील सर्व बांधवांनी घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.

































