अहेरी : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी आलापल्ली आणि अहेरी येथील व्यापारी वर्गाच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
अहेरी आणि आलापल्ली येथील व्यापारी वर्गासोबत धर्मरावबाबांचे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. ऋणानुबंध ते वेळोवेळी जपतात. दिवाळीच्या पर्वावर त्यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपत धर्मरावबाबा यांनी साधेपणाने सर्वांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या लक्ष्मीपुजनातही ते सहभागी झाले.
दीपावलीच्या या पर्वाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृध्दी आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना करून त्यांनी व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.