सुरजागडच्या ठाकूरदेव यात्रेला आ.धर्मरावबाबा आत्राम यांची भेट

देवस्थान विकासाचे दिले आश्वासन

सुरजागडावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.धर्मरावबाबा आत्राम.

एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडावर 5 ते 6 जानेवारीदरम्यान ठाकूरदेवाची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या जत्रेत आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह हजेरी राहून ठाकूरदेवाची पारंपरिक पूजा केली. यानंतर तिथे घेतलेल्या जाहीर सभेत मार्गदर्शन करताना या देवस्थानच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

सदर जत्रेतून आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजातील सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक प्रथा-परंपरा, बोलीभाषा आदींचे दर्शन घडविल्याचे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. त्यांचे जतन करून यात्रेकरूंसाठी विविध सुविधा दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. एटापल्ली तालुक्यातील 70 गावांतील नागरिकांनी या जत्रेत उपस्थिती लावली.