गोसीखुर्द धरणाची 17 दारं उघडून 4500 पर्यंत विसर्ग

वैनगंगा नदीचे पात्र फुगले

गडचिरोली : गोसीखुर्द धरणाच्या वरच्या भागात सतत झालेल्या पावसामुळे धरणाची 17 वक्रदारे शनिवारी उघडून 2000 क्युमेक्स पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडणे सूरू झाले. या धरणावर असलेल्या दोन जलविद्युत प्रकल्पांचा विसर्ग धरून तसेच धापेवाडा प्रकल्पातील विसर्ग मिळून एकूण वैनगंगेच्या पात्रात 4500 क्युमेक्सपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहणे सुरू झाले आहे.

नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांनी तसेच सर्व यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी बाळगून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.