गोंडवाना सैनिकी विद्यालयात जिल्हास्तरीय बॅाल बॅडमिंटन स्पर्धा

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ निवडणार

गडचिरोली : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा व राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड चाचणीचे आयोजन स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात करण्यात आले आहे. जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हास्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत गोंदिया येथे होत असलेल्या 43 व्या सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेकरिता गडचिरोली जिल्ह्याचा मुले व मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे. या संघामध्ये निवड होण्याकरिता खेळाडूचा जन्म हा 2-1-2009 नंतरचा असावा. निवड चाचणीचे आयोजन हे जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन शालेय स्पर्धा आटोपल्यानंतर लगेच होणार आहे. सहभागी खेळाडूंनी आपल्या जन्माचा पुरावा म्हणून आधार कार्ड व जन्माचा दाखला सोबत घेऊन यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.