गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अॅम्युचर क्रीडा कराटे डो असोसिएशनच्या वतीने 16 वी जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विविध वजनगटात जिल्ह्याच्या अनेक भागातून कराटेपटूंनी सहभागी होऊन आपले कौशल्य दाखवत मेडल पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराटे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे तर पाहुणे म्हणून जिल्हा कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक सुप्रसिद्ध बडकेलवार, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहायक आयुक्त संदीप भांड, पत्रकार अविनाश भांडेकर, रुपराज वाकोडे, मिलिंद उमरे, तसेच अविनाश वरगंटीवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन योगेश चव्हाण यांनी केले.
ही स्पर्धा वयोगट 6 ते 21 वर्ष या वजनगटात मुले/मुली अशा गटात घेण्यात आली. स्पर्धेचे आकर्षण असणारी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॅाफी सब ज्युनिअर मुलींमध्ये प्रथम दीपेश्री इंगुलकर, दितीय सुरभी इंगुलकर, तृतीय क्रमांक आर्या चहांडे, तसेच सबज्युनिअर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मुलांमध्ये प्रथम सार्थक नेरकर, दितीय प्रेम देशमुख तर तृतीय क्रमांक आर्यन बावणे याने पटकावला. तसेच सिनियर गटात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मुलींमध्ये प्रथम आरोही चव्हाण, दितीय लावन्या कोवे, तृतीय चेतना वाईलकर, तसेच सिनियर गटात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन प्रथम प्रथम कोरेत, द्वितीय सार्थक गेडाम, आणि तृतीय क्रमांक क्रिश घोगरे याने पटकावला.
बेस्ट काता सब जुनिअरमध्ये मुलींमधून प्रिषा काबरा, सावी पेरशिंगवार, मुलांमध्ये क्रियांश भवरे, ओम भांड, तसेच उत्कृष्ट काता कराटेपटू म्हणून प्रिषा काबरा व सार्थक नेरकर यांना गौरविण्यात आले. सर्वात उत्कृष्ट कराटेपटूचा बहुमान प्रेम देशमुख याने पटकावला. उत्कृष्ट टीमचा बहुमान गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली यांनी मिळविला.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता पंच म्हणून मिलिंद गेडाम, महेंद्र वटी, प्रज्ञासूर्या रामटेके, शुभम कोडे, प्रथम वाकोडे, मोहित मेश्राम, सुनील कांबळे, क्रिष्णा चव्हाण, प्रथम कोरेत, अमित फुले, कपिल मसराम, सोनाली चव्हाण यांनी सहकार्य केले.