डॅा.आंबेडकर हे सर्व समाजासाठी दीपस्तंभ, त्यांचे विचार घ्या- डॅा.नेते

आमदार कार्यालयात भीमजयंती साजरी

गडचिरोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी झाली.

या गौरवशाली सोहळ्याची सुरुवात माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी उपस्थितांनी ‘जय भीम’चा जयघोष करत सामूहिक अभिवादन केले.

यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपेच जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुका महामंत्री रमेश नैताम, विनोद देवोजवार, दलित नेते देवाजी लाटकर, जनार्दन साखरे, केशव निंबोड, अविनाश विश्रोजवार, कीर्ती मासुरकर, गुड्डू सरदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना मा.खा.डॉ.नेते यांनी बाबासाहेबांचे संवैधानिक, शैक्षणिक आणि सामाजिक योगदान सांगत नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा स्वीकार करून ते आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. डॉ.आंबेडकर हे केवळ दलितांचेच नव्हे, तर समस्त भारतीयांचे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांचा प्रकाश आजच्या तरुणाईने घेऊन आपले जीवन उजळवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.