माजी मंत्री मुनगंटीवार यांचा मा.खा.डॉ.नेते यांनी केला सत्कार

‘कोहिनूर ऑफ इंडिया’चे मानकरी

गडचिरोली : लंडन येथे नुकत्याच झालेल्या समारंभात लोकनेते, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांचा चंद्रपूर येथील निवासस्थानी सत्कार केला. (अधिक बातमी खाली वाचा)

हा सन्मान केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे डॅा.नेते म्हणाले. यावेळी मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.

‘जनतेच्या सेवेसाठी अखंडितपणे कार्यरत राहून, विकासाच्या मार्गावर सतत पुढचे पाऊल ठेवत असलेल्या सुधीरभाऊंना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान आपल्यासाठी मोठा अभिमानस्पद आहे. या गौरवामुळे महाराष्ट्राची शान वाढली आहे,’ अशी भावना डॅा.नेते यांनी व्यक्त केली.