डॅा.गोगुलवार दाम्पत्याला यंदाचा सोमेश्वर पुसतकर स्मृति पुरस्कार जाहीर

2 ऑगस्टला नागपुरात होणार समारंभ

गडचिरोली : विदर्भाची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत योगदान देणारे कृषी विकास प्रतिष्ठानचे तत्कालीन उपाध्यक्ष स्व.सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिला जातो. सामाजिक योगदानासाठी दिल्या जाणारा यंदाचा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यात गेल्या साडेतीन दशकांपासून वैद्यकीय सेवा आणि जनजागृतीसाठी काम करणारे डॅा.सतीश गोगुलवार आणि डॅा.शुभदा देशमुख या दाम्पत्याला दिला जाणार आहे.

एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या “सोमेश्वर पुसतकर स्मृती पुरस्कारा”चे स्वरूप आहे. पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या हस्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार आहे. हा कार्यक्रम सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिदिनी 2 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता, धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा परिसर, शंकरनगर चौक नागपूर येथे होणार आहे.