राज्यपालांचे परिसहायक डॅा.श्रेणिक लोढा गडचिरोलीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक

वैद्यकीय सेवेतून पोलीस सेवेकडे वळले

गडचिरोली : गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून डॅा.श्रेणिक लोढा (आयपीएस) यांना नियुक्ती मिळाली आहे. एमबीबीएस पदवीधारक असलेले डॅा.लोढा राज्यपालांचे परिसहायक म्हणून कार्यरत होते. एएसपी कुमार चिंता यांची यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

मूळचे बिड जिल्ह्याचे रहिवासी असलेले डॅा.लोढा यांनी ससून रुग्णालयात आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासीबहुल भागात वैद्यकीय सेवा दिली आहे. 2018 मध्ये त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस दलात सेवा सुरू केली.