‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या विदर्भ अध्यक्षपदी दुडमवार

पत्रकारांच्या समस्या मांडणार

गडचिरोली : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी व्यंकटेश दुडमवार यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे मुख्य संयोजक तथा राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ आणि मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने यांनी दुडमवार यांची नियुक्ती केली. (अधिक बातमी खाली वाचा)

या नियुक्तीमुळे विदर्भातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुडमवार यांनी या जबाबदारीचे स्वागत करत पत्रकारितेच्या उन्नतीसाठी समर्पित राहण्याचे आश्वासन दिले.

दुडमवार यांनी आपली कारकीर्द चंद्रपूर येथून प्रकाशित होणाऱ्या सन्नाटा या वृतपत्रामध्ये अहेरी शहर प्रतिनिधी म्हणून सुरू केली होती. त्यांनी मागील 23 वर्षात विविध वृत्तपत्रे, डीजीटल मिडिया व टीव्ही न्युज चॅनेलमध्ये काम केले आहे. ते सध्या गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यासाठी ‘आज तक’ या टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.