शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचा आज गडचिरोली जिल्हा दौरा

शैक्षणिक गुणवत्तेचा घेणार आढावा

गडचिरोली : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे आज गुरुवारी, (7 ऑगस्ट) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

सकाळी 10 वाजता भुसे यांचे गडचिरोली येथे आगमन होईल. 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा व मार्गदर्शन. तर दुपारी 1.30 वाजता शासकीय वाहनाने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.