गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दे-आसरा फाऊंडेशन, आणि इन्क्युबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.25) गोंडवाना विद्यापीठात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार-उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यामध्ये डॉ.रविंद्र अहेर (बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटजिस्ट), अमर नायसे (ब्रेन ऑप्टिमायझेशन कोच) व अनिरूद्ध आठवले (मेंटर, इनफेड-IIM नागपूर) हे उपस्थित राहून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विविध नामांकित कंपन्यासुध्दा सहभागी होणार आहेत.
सदर मेळाव्याकरिता ईच्छुक असलेल्या उमेदवारांनी, उद्योजकांनी 25 मार्च रोजी गोंडवाना विद्यापीठ, कोटगल रोड गडचिरोली येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
































