गडचिरोली : नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरीता आज गडचिरोलीत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा खास महिलांसाठीच असला तरी दुसऱ्या टप्प्यात पुरूष उमेदवारांनाही संधी राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली, महिला महाविद्यालय गडचिरोली आणि फुले-आंबेडकर महाविद्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजतापासून महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे हा रोजगार मेळावा भरेल.
या रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी नामांकित कंपन्या, आस्थापनांमध्ये विविध रोजगार व नोकरीच्या संधीसाठी उद्योजक सहभागी होणार आहेत. त्यातून बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत विविध पदांकरीता उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून निवड करण्यात येणार आहे.
जिल्हयातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यास उपस्थिती राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता श्रीमती सक्रापुरे – 8788257016 यांच्याशी संपर्क करावा.
































