गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास केंद्र, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 22 जुलै 2025 रोजी गोंडवाना विद्यापीठात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये एल.आय.सी. गडचिरोली, ए.आर.इंडस्ट्री, आदिवासी बांबू सहकारी संस्था गडचिरोली, एस.बी.आय. लाईफ इन्स्युरन्स, विदर्भ इंजिनिअरिंग गडचिरोली, विदर्भ ट्रॅक्टर्स गडचिरोली, आर्या कार्स गडचिरोली, सहयोग मल्टिस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी नागपूर, मुथुट फायनान्स नागपूर, वैभव एंटरप्राईज नागपूर, व्हिनस ऑटोमोटीव्ह गडचिरोली, क्विस स्टॉफिंग सोल्युशन नागपूर इत्यादी कंपन्या व त्यांचे उद्योजक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडील इन्स्युरन्स ॲडवाईझर, मशीन ऑपरेटर ट्रेनी, वेल्डर / टर्नर/ मेकॅनिक, कॉम्पुटर ऑपरेटर, सेल्स कंन्सल्टन्स, टेक्निशियन, सर्व्हिस ॲडवाईझर, फ्लोअर सुपरवायझर, रिलेशनशिप ऑफिसर, अप्रेंटिसशिप ट्रेनी, एच.आर., सेल्स मॅनेजर, डिलर सेल्स एक्झिक्युटीव, फिल्ड सर्व्हिस ॲडवायझर, अकाऊंट ऑफिसर, अंकाऊन्टंट, पॅन्ट्रीमेड, सिक्युरिटी गार्ड, प्रोडक्शन ट्रेनी इत्यादी पदांवर रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. तसेच शासकिय महामंडळे त्यांच्याकडील स्वयंरोजगाराच्या योजनांबाबतची माहिती दिली जाणार आहे.
सदर रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्ससह स्वखर्चाने दि.22 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन गोडवाना विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.