कुरखेडा : तालुक्यातील वाकडी (मोहगाव) येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाला भेट देत हनुमानाची कथा आणि नव्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
दि.1 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता घटस्थापना आणि दि.2 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता शिवलिंग स्थापना तथा दुपारी गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने गावातील भाविकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, ज्ञानेश्वर कापगते, प्रदीप धोडणे, ओमप्रकाश मेश्राम यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
































