गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील विविध प्रलंबित व सुरू असलेल्या विकास कामांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व आदिवासी भागातील सुविधा वाढवण्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
