गडचिरोली : आधारभुत किमतीनुसार धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये धान / भरडधान्य शासनाच्या केंद्रांवर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी दिलेली 15 डिसेंबरपर्यंतची मुदत पुन्हा वाढवून ती आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन मर्या., जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या गावाला जोडलेल्या धान खरेदी केंद्रावर जावून धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी केले आहे.
































