चामोर्शी : येथील संत जगनाडे महाराज एग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना मोफत खते व निविष्ठा वाटपाचा कार्यक्रम दि.20 ऑगस्टला माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनु.जनजाती मोर्चा) अशोक नेते यांच्या हस्ते झाला. चामोर्शीतील प्रभाग क्रमांक 3, गोंडपुरा येथील संताजी क्रीडांगणात झालेल्या या कार्यक्रमाला कंपनीचे सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.
केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं राबवत आहेत. त्यामुळे या सरकारच्या पाठीशी शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, नगरसेविका सोनाली पिपरे, सोशल मिडिया संयोजक तथा बंगाली आघाडीचे रमेश अधिकारी, जेष्ठ नेते श्रावण सोनटक्के, तुळशीदास (बंडूभाऊ) नैताम, श्रीधर पेशट्टीवार आदि पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.