मॅाडेलिंग, फॅशन-शो साठी अभिनेत्री सारा खान रविवारी गडचिरोलीत

धर्मरावबाबा आत्राम उद्घाटन करणार

गडचिरोली : गडचिरोलीत प्रथमच येत्या रविवारी राज्यस्तरीय मॉडेलिंग व फॅशन शो स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यासाठी सिने अभिनेत्री सारा खान विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. येथील संस्कृती हॉलमध्ये रविवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे.

या आधी ‘ग्लॅम फेस ऑफ विदर्भ फॅशन शो’ सिझन 1 आणि सिझन 2 झाले आहे. आता ‘मेगा ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र फॅशन शो’ सिझन 1 होणार आहे. या मध्ये मॉडेलिंग स्पर्धा, मेकअप आणि मेहंदी स्पर्धा, याशिवाय फॅशन शो होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजिका ज्योती उंदीरवाडे यांनी केले आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांचा सुधारित दौरा

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा 15 सप्टेंबर रोजीचा सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9 वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता पंचवटीचा राजा गणेशोत्सव मंडळ, पंचवटी नगर आय.टी.आय. चौक, गडचिरोली येथे भेट. सकाळी 10.45 वाजता संस्कृती हॉल, गडचिरोली येथे ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र ग्रँड फिनाले या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 ते दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे राखीव. दुपारी 1.15 वाजता गोंदियाकडे प्रयाण. तेथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी 4.35 वाजता अहेरी येथे आगमन व मुक्काम.