देसाईगंज : तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) येथील बौद्धविहाराला संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. याशिवाय आवारात काँक्रिटीकरण आणि किन्हाळ्यात सीमेंट रोडचे बांधकामही केले जाणार आहे. या कामाचा शुभारंभ माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन करून झाला.
सन 2024-25 या वर्षात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मोहटोला येथील बौद्धविहाराला संरक्षण भिंत व काँक्रिटीकरण तसेच किन्हाळा येथे मुख्य रस्ता ते प्रभाकर लोखंडे यांच्या घरापर्यंत सीमेंट रोडच्या बांधकामाचे भूमिपूजन कृष्णाभाऊ गजबे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच सुरेश दोनाडकर, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार कावळे, यशोधरा लोखंडे, भाजपचे तालुका महामंत्री वसंत दोनाडकर, कृउबा समितीचे संचालक हिरालाल शेंडे, माजी सरपंच कैलास पारधी, तसेच नरेश हरडे, योगेश राऊत, अविनाश नारनवरे, कैलास लोखंडे, भागवत लोखंडे, प्रभाकर लोखंडे, लक्ष्मण नाकाडे, रमेश नारनवरे, चरण लोखंडे, गोसावी चाहांदे, सुरेश लोखंडे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.