सिरोंचा : तालुक्यातील असरअल्ली येथील सुप्रसिद्ध येल्लारम पोचम्मा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येल्लारम पोचम्मा बोनालू यात्रेचे आयोजन केले होते. या बोनालू कार्यक्रमाला माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी क्षेत्राचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी आर्थिक मदत केली.
या बोनालू कार्यक्रमादरम्यान सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे पदाधिकारी व असरअल्ली परिसरातील नागरिकांनी येल्लारम पोचम्मा देवी मंदिराला भेट देऊन पोचम्मा देवीची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, सत्यनारायण चिलकामारी, संतोष भीमकरी व मंदिराचे पुजारी, तसेच कार्यकर्ते आणि हजारो भाविक उपस्थित होते.
उत्साहाच्या वातावरणात हजारो भाविकांनी या बोनालू उत्सवाला हजेरी लावली. उत्सवादरम्यान त्यांच्यासाठी विविध सुविधा देण्यात आल्या.
































