आगीत उद्ध्वस्त झालेला मडावी कुटुंबाचा संसार पुन्हा उभा राहणार

माजी जि.प.अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून मदत

मडावी कुटुंबियांचे सांत्वन करून मदत देताना अजय कंकडालवार

अहेरी : आगीत घरासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने येरमनार (टोला ) येथील डोलू पेन्टा मडावी यांचे कुटुंब उघड्यावर आले. त्यांच्या उद्ध्वस्त संसाराला सावरण्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे केला. यामुळे मडावी कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.

डोलू मडावी यांच्या घराला शनिवारी अचानक आग लागली आणि त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. जीवनावश्यक वस्तू व पैसे, आधार कार्ड, बँकेचे पास बुक व आवश्यक कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजय कंकडालवार यांनी येरमनार गाठले. घटनास्थळी चारचाकी वाहन जात नसल्याने २ किलोमीटर पायी जाऊन त्यांनी मडावी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्या कुटुंबाचे सांत्वन करत जीवनावश्यक साहित्य, जसे तांदूळ, तेल, दाळ, साबण व कपडे, तसेच आर्थिक मदत केली. प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठीही मदत करणार असल्याचे सांगत कुटुंबाला धीर दिला.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, भामरागड पं.स.चे माजी उपसभापती लालसु आत्राम, मल्लेमपोडूर ग्रा.पं.चे माजी सरपंच सुधाकर तिम्मा, पेरमल्लीच्या सरपंच किरण नैताम, माजी उपसरपंच साजन गावडे, येरमणारचे उपसरपंच विजय आत्राम, मेडपल्लीचे उपसरपंच दलसु आत्राम, ताडगाव आदिवासी सह.संस्थेचे उपसभापती लच्छु आत्राम, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, तसेच कुटुंबातील सदस्य इरपे डोलु मडावी, प्रदीप मडावी, प्रशांत मडावी, सपना मडावी तथा गावातील नागरिक उपस्थित होते.