आष्टीकरांना चढणार फुटबॉलचा ज्वर, मा.खा.अशोक नेते यांनी केले उद्घाटन

छत्रपती संस्था आणि क्लबचे आयोजन

आष्टी : परिसरातील क्रीडा प्रतिभेला चालना देण्यासाठी छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था व छत्रपती शिवाजी महाराज फुटबॉल क्लब आष्टीच्या वतीने फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले हायस्कूलच्या पटांगणात एक आठवडा रंगणाऱ्या या सामन्यांचे उद्घाटन बुधवारी (दि.26) माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी सेल) अशोक नेते यांच्या हस्ते फित कापुन व पायाने फुटबॉल उडवून करण्यात आले.

आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक युवक दिवसेंदिवस मोबाईलमध्ये व्यस्त असताना दिसतात. त्यामुळे शरीरिक हालचाल होत नाही. शरीर तंदुरुस्तीसाठी आणि निरोगी राहण्यासाठी असे मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. युवा वर्गाला मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी या फुटबॅाल सामन्यांचे आयोजन प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे आठवडाभर रंगणाऱ्या या सामन्यांचा वादविवाद न करता मनमुराद आनंद घ्या, असे आवाहन उद्घाटनप्रसंगी माजी खासदार अशोक नेते यांनी केले.

या फुटबॉल सामन्यांतील विजेत्या संघांसाठी प्रथम बक्षीस 51 हजार रुपये (मा.खा.अशोक नेते यांचेकडून) आणि शिल्ड पोलीस निरीक्षक काळे यांच्याकडून, द्वितीय बक्षीस 31 हजार रुपये (भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चाचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंद नरोटे यांच्याकडून) तृतीय बक्षीस 21 हजार रुपये (आ.डॅा.देवराव होळी यांचेकडून), तर शिल्ड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्याकडून, चतुर्थ बक्षीस 11 हजार रुपये (ॲड.विश्वजीत कोवासे यांच्याकडून) तर शिल्ड एफ.डी.सी.एम. विभागाकडून दिले जाणार आहे.

सामन्यांच्या उद्घाटन कार्यक्रमाला मंचावर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, आष्टीच्या सरपंच बेबी बुरांडे, आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे, प्राचार्य आणि शिक्षकवृंद, रतन पोतगंटवार, अशित बैरागी, योगेश बिश्वास, शुभम हलदार, तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक, खेळाडू आणि विद्यार्थी उपस्थित होते.