खेळातून मिळतो आरोग्य आणि एकात्मतेचा संदेश- डॉ.नेते

आनंदग्राममध्ये फुटबॅाल सामने

चामोर्शी : तालुक्यातील आनंदग्राम येथे आयोजित फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्रीगणेश स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने या सामन्यांचे आयोजन केले आहे.

याप्रसंगी बोलताना डॉ.नेते म्हणाले, ‘फुटबॉलसारख्या सांघिक खेळातून संघभावना, एकाग्रता आणि निरोगी शरीर मिळते. या खेळात प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या इशाऱ्यावर खेळत असतो आणि तीच एकजूट आज समाजात आवश्यक आहे.दरवर्षी आनंदग्राममध्ये होत असलेल्या या फुटबॉल स्पर्धा युवकांना एकत्र आणण्याचे मोठे माध्यम ठरत आहे. त्यामुळे तरुणांनी मोबाईलपासून थोडे दूर जाऊन मैदान गाठावे आणि स्पर्धात्मकतेतून मैत्रीचा धडा गिरवावा,’ असे आवाहन त्यांनी केले.

राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे मानून मी लोकसभेच्या 10 वर्षांच्या काळात विकासाची अनेक कामे केली. वादविवाद न करता खेळाचा आणि जीवनाचा आनंद घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, चामोर्शीच्या तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, घोट मंडळाचे तालुकाध्यक्ष राकेश सरकार, ओबीसी नेते अनिल पोहनकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, तसेच दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा, देवेश फौजदार, माजी जि.प.सदस्य नामदेव सोनटक्के, अनिता रॅाय, उपसरपंच मेनका रॉय, मधुकर भांडेकर, निरज रामानुजवार, विमल सेन, कविता किरमे, आकुली बिश्वास, विलास उईके, विकास मैत्र, निरंजन बाच्छाळ यांच्यासह आयोजन मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंदग्रामच्या मैदानावर उसळलेल्या उत्साहाने परिसरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली होती. फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने गावात खेळ व सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.