कुरखेडा : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानवी आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आरोग्यावर खर्च कमी करायचा असेल तर सर्वांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा उपयोग करावा, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तालुका कृषी कार्यालय कुरखेडा यांच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी महेश परांजपे, प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, गटविकास अधिकारी धीरज पाटील, उमेदचे तालुका व्यवस्थापक सरोज मारेकरी, नगराध्यक्ष अनिता बोरकर, उपाध्यक्ष बबलू हूसैनी, अध्यक्ष शेतकरी तालुका समन्वय चांगदेव फाये, सामाजिक कार्यकर्ते गणपतराव सोनकुसरे, नगरसेवक अॅड.उमेश वालदे, नगरसेवक अशोक कंगाली, ना.तहसीलदार मानकर, कवियत्री संगिता ठलाल, मरसकोल्हे आदी उपस्थित होते.
यावेळी कुरखेडा तालुक्यातील विविध बचत गटांच्या महिलांनी रानभाज्यांचे स्टॉल लावून रानभाज्याची महती पटवून दिली. यावेळी कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.