गडचिरोली : जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील धानोरा व कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल इमारतींचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमाला धानोरा येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रभू सादमवार, मुकेश गेडाम, केवल गण्यारपवार, वीज अभियंता दितेश पारेख, मुकुल बोडगेवार, संदीप सपकाळ, मनोज पंधारे, लाभ सिंह, मनोज चौधरी, साहिल वाट, राहुल राठोड, पराग मेश्राम आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल इमारतीच्या भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमाला विनोद लांजेवार, राहुल पाटील, गुणवंत फाये आदी उपस्थित होते.
































