राज्यस्तरीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याची दमदार कामगिरी

एका सुवर्णासह 11 पदकांची कमाई

गडचिरोली : नांदेड येथे झालेल्या 23 व्या राज्यस्तरीय वुशु सीनियर महिला व पुरुष अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याने दमदार कामगिरी करत एकूण 11 पदके पटकावली. यामध्ये 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कास्यपदकांचा समावेश आहे.

विजेत्या खेळाडूंमध्ये अमोल पुरोहित, शेष कुकडकर, चेतन इंगळे, प्राची बडोदे, प्रिया कापकर, राहुल मडावी, यश पडलवार, नावेद पठाण, यासिन सय्यद यांचा समावेश आहे. अहेरीचा खेळाडू अमोल पुरोहित याने स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. सलग दोन वर्ष गडचिरोलीच्या संघाने 10 पेक्षा जास्त पदके पटकवण्याची कामगिरी केल्यामुळे या खेळाडूंचे कौतुक होत आहे.

विजेत्या खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, वुशु असोसिएशन ऑफ गडचिरोली डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष अनिल साळवे, संघटनेच्या सचिव डॉ. स्नेहल कहुरके यांनी अभिनंदन केले. खेळाडूंनी आपच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक मिलिंद साळवे, अली सय्यद यांना दिले.