गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने पुणे येथे झालेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात तीन एक सिल्व्हर आणि दोन ब्रॅान्झ मेडल पटकावले. घातपातविरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च या उपप्रकारात सिल्वर व ब्रॅान्झ तसेच श्वानपथक स्पर्धेमधील एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन या उपप्रकारात ब्रॅाझ अशी तीन पदके पटकावली.
राज्यात शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना गुन्हेगारीचे स्वरुपही बदलत आहे. त्यातच वेगवेगळा बंदोबस्त आणि तुलनेत अपुरे पोलीस बळ, अशा स्थितीत 24 तास ऑन ड्युटी राहणारे पोलीस आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलिसांना अधिक सक्षम व अपडेट होणे आवश्यक बनले आहे. पोलिसांनी कौशल्याने तपास कसा करावा; त्या कौशल्यात ते अपडेट राहावे यासाठी पुणे येथे सहा दिवस 19 व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते.
या मेळाव्यात एकुण 25 वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये गडचिरोली पोलीस दलास सातवे स्थान मिळाले आहे. नागपूर परिक्षेत्राला पाच बक्षिसे मिळाली असून घातपात विरोधी तपासणी या स्पर्धेमधील ग्राउंड सर्च या उप-प्रकारात गडचिरोली पोलीस दलातीत बीडीडीएस शाखेतील पोअं/9393 धम्मदीप मेश्राम हे सिल्वर व पोहवा/2489 पंकज हुलके हे ब्राॉझ पदकाचे मानकरी ठरले. यासोबतच गडचिरोली पोलीस दलातील हनी या श्वानाने श्वानपथक स्पर्धेमधील एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन या उप-प्रकारात ब्रॅाझ पदक पटकाविले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पदक प्राप्त जवानांचे व श्वानाचे कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.