गडचिरोली : गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यास व जैन कलार समाज गडचिरोली शहराच्या वतीने शहरातील जैन कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा आणि कोजागिरीचा कार्यक्रम बुधवारी (8 ऑक्टोबर) कमल-केशव कात्रटवार सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाची प्रगती व हितासाठी या कार्यक्रमात विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यासचे अध्यक्ष रतन शेंडे होते. उद्घाटन जैन कलार सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष बंडू शनिवारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून न्यासचे सचिव पांडुरंग पेशने, जैन कलार समाज बचत गटाचे अध्यक्ष प्रदीप रणदिवे, सचिव मनोज कवठे, हिना बांगळकर, महेश मुरकुटे, राजू घुगरे, वर्षा शनिवारे, सुरेखा रणदिवे, वैशाली लाड, अर्चना खानोरकर, ज्योती मानापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम गजेंद्र भिवापुरे, प्रमोद घोसेकर, लक्ष्मीबाई मानापुरे, पुष्पा तिडके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नवागत समाज बांधवांचा परिचय करून घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक दिलीप समर्थ, गुलाबराव मानापुरे, नलिनी मानापुरे आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी अशोक मानापुरे, मुरली खानोरकर यांचा सपत्निक, तसेच ललिता मुरकुटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थी आंजनेय डांगे, आरोही तिडके, सिद्धी हरडे यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी नृत्य व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. मनमोकळ्या, उत्साहवर्धक व स्नेहपूर्ण वातावरणात उपस्थित समाजबांधवांनी स्नेहभोजन व रात्री कोजागिरीचा आनंद घेतला. एकमेकांसोबत संवाद साधून नियोजनात्मक चर्चा केली.

समाजभवनासाठी प्रयत्न करणार

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना रतन शेंडे म्हणाले, कलार समाजामध्ये गुणवंतांची कमतरता नाही. पालकांनी आपल्या पाल्याला घडविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. समाज भवनासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकसंघ राहण्याची गरज व्यक्त केली. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक डॉ.उमेश समर्थ यांनी, तर संचालन पराग दडवे यांनी केले. आभार प्रदर्शन गुरुदेव किरणापुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी दिलीप आष्टेकर, नितीन डांगे, निलेश डांगे, प्रकाश डांगे, भोजराज दडवे, अनिल तिडके, विजय तिडके, रमेश गोटेफोडे, अरविंद गुरुकार, डॉ.पियुषा समर्थ, जयश्री आष्टेकर, रिना दडवे, रोशनी डांगे, नमिता डांगे, तेजस्विनी किरणापुरे, ज्योती फरांडे, नंदा डांगे, दिपाली दडवे, सपना तिडके, रेखा गुरुकार, मंगला गोटेफोडे, कल्पना तिडके यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्रदीप लाड, सुधीर शेंडे, ॲड.अरुण रणदिवे, राजेंद्र लांजेकर, विजय मुरकुटे, किशोर भांडारकर, कविश्वर बनपूरकर, सुरेश वैरागडे, अरुण हरडे, सुनील हजारे, स्वाती कवठे, भाग्यश्री शेंडे, अरुणा लांजेकर, स्नेहा शेंडे, सरिता पेशने, अर्चना भांडारकर, कल्पना लाड, लता मुरकुटे, रेखा समर्थ, गुरुदेव हरडे, राजेंद्र खानोरकर, रवी समर्थ आदींसह जैन कलार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











