गडचिरोली : सन 1991 पासून गोटुल भूमी लांझेडा (गडचिरोली) येथे गडचिरोली जिल्हा गोटुल समितीच्या वतीने दरवर्षी दसरा या सणाला आदिवासींच्या देवी-देवतांचे पूजन व आदिवासी मेळाव्याचे आयोजन दरवर्षी केले जात आहे. यावर्षीही सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता गोटूल समितीची सर्वसाधारण सभा 7 सप्टेंबर रोजी जिल्हा जंगल कामगार कार्यालय गडचिरोली येथे झाली. गोटूल समितीचे जिल्हाध्यक्ष नंदू नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेत प्रामुख्याने 2 आॅक्टोबर रोजी होणाऱ्या महापुजा व मेळाव्याच्या आयोजनावर चर्चा करण्यासोबत गोटुल समितीची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. बैठकीत गोटूल भूमीचे जतन, व्यवस्थापन व भविष्यातील उपयुक्ततता यावर व समाजासाठी उद्बोधन केन्द्र व्हावे यासाठी गोटुल भूमीचा प्रभावीपणे वापर होण्यावर चर्चा झाली.
30 वर्षानंतर नवीन कार्यकारिणी
30 वर्षानंतर गोटुल समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष नंदू नरोटे, कार्याध्यक्ष आमदार डॉ.मिलिंद नरोटे, सचिव देवराव आलम, उपाध्यक्ष माजी आमदार डॉ.देवराव होळी, प्रकाश गेडाम, माधवराव गावळ, सदानंद ताराम, माधुरी मडावी, आरती कंगाले, मोहन पुराम, सहसचिव सुरज मडावी, उमेश उईके, डॉ.चंदा कोडवते, विनायक मडावी, कोषाध्यक्ष अमरसिंग गेडाम आणि सदस्यांमध्ये विद्या दुर्गा, मालता पुडो, कमलताई मडावी, रुपेश वलके, जगदीश कुमरे, विलास नरोटे, शिवाजी नरोटे, सल्लागार तथा मार्गदर्शक- डॉ.देवाजी तोफा, खा.डॉ.नामदेव किरसान, माजी मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम, माजी खासदार डॉ.अशोक नेते, माजी खासदार मारोतराव कोवासे, आ.रामदास मसराम, माजी आमदार दीपक आत्राम, आनंदराव गेडाम, हिरामण वरखडे, तांत्रिक सल्लागार- डॉ.सचिन मडावी, फरेंद्र कुतीरकर आदीचा समावेश आहे.