प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा आज गडचिरोलीत होणार सत्कार

शिक्षक दिनानिमित्त 13 शिक्षकांची निवड

गडचिरोली : जिल्हा परिषदेने वर्ष 2023-24 या वर्षासाठी प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या एका शिक्षकाची निवड केली आहे. शिक्षक दिनानिमित्त त्यांचा आज दि.5 सप्टेंबर रोजी सत्कार केला जाणार आहे. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित शिक्षक दिन सन्मान सोहळ्यात प्राथमिक विभागातून 12 तर माध्यमिक विभागातून एका शिक्षकाला सन्मानित केले जाणार आहे.

सन्मानित केल्या जाणाऱ्या शिक्षकांमध्ये घनश्याम हटेवार (उच्च प्राथमिक शाळा खुर्सा, ता.गडचिरोली), थलाश धाकडे (प्रा.शाळा शेगाव, ता.आरमोरी), साधना भुरसे (प्रा.शाळा डोंगरगाव, ता.देसाईगंज), गुरूदेव मेश्राम (प्रा.शाळा हुऱ्यालदंड, ता.कुरखेडा), गौरव कावळे (प्रा.शाळा टाहकाटोला, ता.कोरची), जितेंद्र रायपुरे (प्रा.शाळा कारवाफा, ता.धानोरा), आशिष येल्लेवार (उ.प्रा.शाळा नवैगाव रै, ता.चामोर्शी), दीपक मंडल (प्रा.शाळा उदयनगर, ता.मुलेचरा), वाल्मिकी वन्नेवार (प्रा.शाळा कसुरवाही, ता.एटापल्ली), जगन्नाथ बडगे (प्रा.शाळा कुमरगुडा, ता.भामरागड), रवींद्र येमसलवार (प्रा.शाळा शिवणीपाठ, ता.अहेरी), श्रीनिवास रंगू (उ.प्रा.शाळा आसरअल्ली, ता.अहेरी), तर माध्यमिक विभागातून एन.आर.मरस्कोल्हे (जि.प.हायस्कूल, सिरोंचा) यांचा समावेश आहे.