गडचिरोली : शुद्ध सोन्याच्या दराने प्रतितोळा सव्वा लाखाचा टप्पा पार केल्याने सोने खरेदी सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली असे मानले जाते, मात्र सोन्याचे दररोज वाढणारे दर ग्राहकांना सोने खरेदीकडे आकर्षित करत असल्याचा प्रत्यय गेल्या चार दिवसात आला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपूजनापर्यंतचा मुहूर्त साधत गडचिरोलीकरांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र सराफा बाजारात पहायला मिळाले. आठवडाभरापूर्वी शुद्ध सोन्याचे दर 1 लाख 24 हजार (जीएसटी वगळून) होते. (अधिक बातमी खाली वाचा)

चार दिवसातच हे दर 1 लाख 32 हजारापर्यंत वाढले होते. पण ऐन धनत्रयोदशीला हे दर पुन्हा 4 हजारांनी कमी झाले. ही संधी साधत ग्राहकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले. (अधिक बातमी खाली वाचा)

शनिवार आणि रविवारी दर स्थिर असताना सोमवारी गुन्हा एक हजाराने दरात वाढ झाली. सोमवारी सोन्याचे दर 1 लाख 28 हजारापेक्षा जास्त असतानाही सराफा बाजार गजबजलेला होता. (अधिक बातमी खाली वाचा)

ज्या झपाट्याने दिवसागणिक सोन्याचे दर वाढत आहे ते पाहता एक गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे दागिन्यांसोबत कॅाईन किंवा बार/बिस्किट खरेदीला लोक प्राधान्य देत आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

बँकेतील व्याजदरापेक्षा सोन्यातील गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळत असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे हौस आणि गुंतवणुकीचा पर्याय या दोन्ही गोष्टींमुळे लोकांचा सुवर्ण खरेदीकडील कल वाढला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

धनत्रयोदशीपासून कालपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या सुवर्णबाजारात 100 ते 150 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.











