रेगडी, हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

डॉ.प्रणय खुणे यांचे प्रतिपादन

चामोर्शी : ​आपल्या मातीतील संस्कृती आणि लोककला ही आपली खरी ओळख आहे. ती टिकवण्यासाठी नाटक-दंडारसारख्या लोककलांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच रेगडी, हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांनी दिली. त्यांच्या हस्ते चापलवाडा येथे ‘आई तू माझी होशील का?’ या दंडार नाट्यप्रयोगाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.मिलिंद नरोटे होते. दंडार ही आपल्या विदर्भातील एक समृद्ध लोककला आहे, जी केवळ मनोरंजन करत नाही तर समाजाला संस्कार आणि विचारांची दिशाही देते. या नाटकातील कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. ग्रामीण भागातील अशा कलागुणांना वाव मिळणे आणि आपली ही पारंपरिक कला जिवंत राहणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन यावेळी आ.डॅा.मिलिंद नरोटे यांनी केले. ​

याप्रसंगी चापलवाडा येथील ग्रामस्थ आणि नाट्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते भारत खटी, माजी जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, वरफडे गुरुजी, भाजपा आदिवासी मोर्चाचे विलास उईके, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, सरपंच रेखा कोहपरे, नानू उपाध्ये, दिनेश मुजुमदार, विलास वडेट्टीवार, राजू सातपुते, संदीप भोवरे, गुरुदास पालकवार व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.