देसाईगंज तालुक्यात शासकीय धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

मा.आ.गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

देसाईगंज : महाराष्ट्र स्टेट को-अॅापरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.च्या शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या कोरेगाव केंद्राचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्याला देसाईगंज सहकारी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष अन्नाजी तुपट, सरपंच धनंजय तिरपुडे, पं.स.माजी सभापती मोहन पाटील गायकवाड, व्यवस्थापक पी.के.तलमले, तुकाराम गायकवाड, पोलीस पाटील खुशाल मस्के, चेतन मस्के, भागवत गायकवाड, ऋषी गायकवाड, कृष्णा पुस्तोडे, चिंतरंजन नाकाडे, सुधीर गायकवाड, गितेश मस्के, सागर वाघाडे उपस्थित होते. यावेळी शेतकरी प्रेमदास चहांदे यांच्या धानाची मोजणी करुन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

या शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर चोप, कोरेगाव, बोडधा, रावणवाडी, शंकरपूर केंद्राच्या समाविष्ट गावातील शेतकऱ्यांचे धान देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेतर्फे खरेदी केले जाणार आहे. साधारण भात (धान) व ग्रेड ए चे भात (धान) शासकीय दराने खरेदी केल्या जाणार आहे. शेतकऱ्यांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन देसाईगंज सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.