गडचिरोली : राज्याचे राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल महाराष्ट्र दिनाच्या शासकीय ध्वजारोहणासाठी आज गडचिरोलीत येत आहेत. तत्पूर्वी ते आज दि.30 एप्रिल रोजी वनविभाग आणि बांधकाम विभागांच्या कामांचा आढावा घेणार आहेत.
ना.जयस्वाल दुपारी 1 वाजता गडचिरोलीत पोहोचल्यानंतर दुपारी 2 वाजता मुख्य वनसंरक्षक कार्यालयात जिल्ह्यातील वनविभागाच्या कामांचा आढावा घेतील. दुपारी 4 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात जिल्ह्यातील बांधकामविषयक कामांचा आढावा घेतील. सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना व इतर विकास कामांबाबत आढावा, तर सायंकाळी 7 वाजता सक्षम आय.ए.एस.अकादमी येथे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व अकादमीच्या संचालकांसोबत विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करतील. संध्याकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव.

गुरुवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर ध्वजवंदन व अनुषंगिक कार्यक्रमास उपस्थित राहून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. त्यानंतर सोयीनुसार नागपूरला रवाना होतील.