वैरागडमध्ये रंगणार कबड्डी व भजन स्पर्धा, हजारोंच्या बक्षीसांची लयलूट

भोलुभाऊ सोमनानी मित्र परिवाराचे आयोजन

गडचिरोली : ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला चालना देण्यासाठी गणेश उत्सवाच्या पर्वावर वैरागड येथे भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवाराच्या वतीने रात्रकालीन खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 10 ते 15 सप्टेंबर या कालावधीत भोलुभाऊ सोमनानी यांच्या आवारात होतील. याशिवाय महिला, पुरूष आणि बाल अशा तीन गटात भजन स्पर्धाही होणार आहे.

कबड्डी स्पर्धेत प्रथम बक्षीस शितल बलराम (भोलुभाऊ) सोमनानी यांच्याकडून 15 हजार रुपये, द्वितीय वैरागडच्या माजी सरपंच गौरी अजय सोमनानी यांच्याकडून 10 हजार रुपये, तृतीय माजी सरपंच वैशाली रामदास डोंगरवार यांच्याकडून 5 हजार रुपये याप्रमाणे राहणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेस स्वीकारण्याची शेवटची तारीख रविवार, दि.8 सप्टेंबर आहे.

भजन स्पर्धेसाठी शोभाताई सोमनानी यांच्याकडून पुरूष गटासाठी 10 हजार, 7 हजार आणि 5 हजार, महिला गटासाठी प्रथम 3 हजार, द्वितीय 2 हजार तथा बाल गटासाठी प्रथम 3 हजार याप्रमाणे हजारो रुपयांची बक्षीसे ठेवली आहेत. प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी रामदास डोंगरवार- 7773956844, सचिन उमरे- 7507247973 किंवा शिवानी दास- 9860094170 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन भोलुभाऊ सोमनानी मित्र परिवाराने केले आहे. विशेष म्हणजे दोन्ही स्पर्धांसाठी प्रवेश शुल्क म्हणून केवळ पुजेचे नारळ स्वीकारले जाणार आहे.