गडचिरोली : कलार समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने कोजागिरी व स्नेहमिलन कार्यक्रम अॅड.बाळकृष्ण मांडवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दामदेव मंडलवार, प्रमुख अतिथी म्हणून निरंजन पाटील वासेकर, रविंद्र वासेकर, हेमंत जंबेवार, सुनील चडगुलवार, संजय गणवेनवार, वसंतराव मेश्राम, प्रकाश मासुरकर, मंजु वासेकर, रेखा मेश्राम हे उपस्थित होते.

कलार समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन पुढील काळात वधुवर परीचय तसेच विवाह मेळावे आयोजित करावे, असे आवाहन करत त्यावर विचारमंथन करण्यात आले.

या कार्यक्रमात 75 वर्षांवरील रामदास सखाराम हटनागर व बाळकृष्ण दाजीबा देऊळकर यांचा, सेवानिवृत्त मुख्याध्यापक किर्तन लालजी मेश्राम व मोरेश्वर वालोदे, तसेच नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक गणेश किशोर गडपल्लीवार व कर्मचारी रूपाली अनिल पाकलवार, तसेच पदोन्नती मिळालेले पोलीस उपनिरीक्षक उमेश मासुरकर व नरेश कवाडकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी 80 टक्क्यांवर गुण प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थी डॉ.रम्या रविंद्र रंगुवार (बीएएमएस), आदिती रितेश गडपल्लीवार, अथर्व सुनील बोमनवार, शौर्य नितीन बोमनवार, तृप्ती मासुरकर, अनमोल दिलीप गडपल्लीवार, नेहा राजेंद्र गंधलवार यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चडगुलवार, सूत्रसंचालन डॉ.राकेश चडगुलवार तर आभार प्रदर्शन दिलीप मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी दिलीप गडपल्लीवार, किर्तन लालजी मेश्राम, छत्रपती शंकरवार, विजय मारकवार, अविनाश चडगुलवार, नामदेव बनसोड, मोरेश्वर वालोदे, दीपक चडगुलवार यांनी सहकार्य केले.












