ट्रकने सायकलस्वाराला चिरडले, देसाईगंजच्या स्मारकाजवळील अपघात

चालकाला अटक, ट्रकही केला जप्त

देसाईगंज : येथील एका हार्डवेअरच्या दुकानात मजुरी करून घराकडे निघालेल्या मजुराला ट्रकने चिरडल्यामुळे त्या मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी देसाईगंज येथील स्मारकाजवळ घडली. शमशेर खान सत्तार खान पठाण (54 वर्ष), रा.कमला नगर, जवाहर वार्ड असे मृत इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, विर्सी तुकुम येथील ट्रक क्रमांक एम.एच 34, एबी 8867 हा देसाईगंजमधील बायपास मार्गाने वेल्डिंग करण्यासाठी मार्केट भागात जात होता. याचवेळी शमशेर खान हे ट्रकच्या बाजुने सायकलने जात होते. वळणावर खान यांची सायकल ट्रकच्या चाकाखाली आली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक नानाजी वासुदेव उके रा.विर्शी तुकुम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.