गडचिरोली : शिवाजी महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन हा प्रत्येक घटकाला न्याय देणारा होता. महाराजांचे चरित्र हे केवळ युद्धगाथा नसून, ते एक व्यापक समाजप्रबोधन आहे, असे मत प्रा.डॉ.सतीश चाफले यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित ‘शिवाजी महाराजांचे सोशल इंजिनिअरींग’ या विषयावरील व्याख्यान, तसेच बोधचिन्ह व निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, अधिसभा सदस्य नंदा सातपुते, धमेंद्र मुनघाटे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे समन्वयक प्रा.विकास चित्ते, प्रा.डॉ.सुनील बागडे, प्रा.डॉ.कृष्णा कारु उपस्थित होते. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
यावेळी मान्यरांच्या हस्ते बोधचिन्ह व निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धंकांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धेमध्ये गायत्री चौके, स्नेहल मेश्राम व तुषार दुधबावरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. बोधचिन्ह स्पर्धेमध्ये लखन देवतळे, उत्कर्ष नागपुरे व गणपती गज्जेला यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
यावेळी बोलताना चाफले म्हणाले, शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्थेची उभारणी करताना मावळ्यांची गुणग्राहकता व त्यांच्या कौशल्याची पारख करुन स्वराज्य उभारण्यासाठी त्यांच्यावर योग्य तो विश्वास दाखविला. त्यांच्या मदतीने स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांचे धोरण म्हणजे केवळ रणनिती नव्हे, तर समाज सुधारण्याची दूरदृष्टी होती. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत सामाजिक एकता आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्रीराम कावळे यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचे नेतृत्व, प्रशासन आणि दूरदृष्टी यावर सखोल विवेचन केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एक उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि तिला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रभावी धोरणे राबवली. त्यांच्या राज्यकारभारातील व्यवस्थापन कौशल्य आजच्या काळातही मार्गदर्शक ठरते. युवा पिढीने शिवाजी महाराजांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घ्यावी आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे ते म्हणाले. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
प्रा.विकास चित्ते यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे व कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे रसंचालन डॉ.प्रशांत ठाकरे यांनी, तर आभार प्रा.अतुल गावस्कर यांनी मानले. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन समितीच्या सदस्य प्रा.डॉ.संध्या येलेकर, सतीश पडोळे यांच्यासह प्राध्यापकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.