‘लॅायड्स’तर्फे सुरजागडसह कोनसरीत सामुहिक योगाभ्यास

11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस

कोनसरी प्रकल्पाच्या आवारात योगासने करताना अधिकारी-कर्मचारी.

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या (एलएमईएल) वतीने शनिवारी सुरजागड लोहखनिज खाण आणि कोनसरी येथील प्रकल्पात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा केला. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 500 वर लोकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

सुरजागड लोहखाणीमध्ये अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि जवळपासच्या गावातील रहिवाशांनी सामूहिक योगसत्रात सहभाग घेतला. कोनसरी प्रकल्पात अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ग्रामस्थांसह मुला-मुलींनी देखील उत्साहाने भाग घेतला. (अधिक बातमी खाली वाचा)

सहभागी झालेल्यांसाठी दिलेल्या संदेशात, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व आणि या वर्षीच्या ‘एक पृथ्वी, एक आरोग्य योगासह’ या संकल्पनेवर प्रकाश टाकला. “योग ही भारताची जगाला देणगी आहे. एलएमईएलला आज या जागतिक स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या उत्सवात सहभाग नोंदवण्याचा अभिमान आहे. कर्मचारी आणि स्थानिक समुदायांना निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या योगासह इतर उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता एलएमईएल अधोरेखित करते,” असे त्यांनी पुढे सांगितले.

कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या सगळ्यांना एलएमईएलतर्फे अल्पोपहार आणि कॅप देण्यात आल्या.