शरीर तंदुरुस्तीसोबत मानसिकदृष्टया सदृढ राहण्यासाठी खेळ गरजेचे- खा.नेते

नमो चषक क्रिकेटचे उत्साहात उद्घाटन

गडचिरोली : क्रिकेटमुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी खेळ आवश्यक आहे, पण हे करताना कोणताही वादविवाद न करता खिलाडू वृत्तीने खेळ खेळावा, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा वर्गाने मोठ्या आनंदाने एकत्रित येऊन नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. राजे क्रिकेट क्लब ठाणेगांव यांच्या सौजन्याने आयोजित या टेनिस शॉर्ट स्पिच (अंडर आर्म) क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत ४० टीमनी सहभाग नोंदविला आहे.

क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका महत्वाची असते. पंचांनी एखादा निर्णय देताना चुकीचा असेल, तर तो निर्णय टीमला मान्य नसतो. अशा वेळी मोठ्या प्रमाणात वादविवाद, भांडण, झगडे होतात. यात पोलिस स्टेशनपर्यत सुद्धा तक्रारी गेलेल्या आहेत. याकरिता पंचांचा निर्णय योग्य असल्याचे मानूनच क्रिकेटचा खेळ खेळावा, असे खा.नेते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी हातामध्ये बॅट घेऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. या स्पर्धेत प्रथम परितोषिक ३१००१ रुपये, द्वितीय २१००१ रुपये तर तृतीय परितोषिक ११००१ व आकर्षक चषक विजेत्या संघांना दिले जाणार आहे.

यावेळी लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, आरमोरी कृउबा समितीचे सभापती ईश्वर पासेवार, सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे, डोंगरगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डंबाजी जामृतवार, पोलीस पाटील उतम पेंदाम, माजी उपसरपंच लालाजी कुकुडकर, बाबासाहेब नैताम, सोशल मीडियाचे ओंकार मडावी, भाजपा युवा वॉरियर्सचे विकास पायडलवार, उपसरपंच लोमेश सहारे, ग्रा.पं.सदस्य सचिन कुथे, ग्रा.पं.सदस्य सरिता नैताम, अनिल नैताम, गोपाल भांडेकर, अक्षय नैताम, अभिषेक भुरसे, रोशन लक्षणे, प्रतिक भुरसे तसेच मोठ्या संख्येने युवा वर्ग, गावातील नागरिक, बालगोपाल उपस्थित होते.