छत्तीसगडच्या कारची सायकलला धडक, दूध विक्रेता जागीच ठार

वाकळी फाट्यावर सकाळचा अपघात

गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शी महामार्गावरील वाकडी फाट्याजवळ भरधाव वेगाने चामोर्शीकडे जाणाऱ्या कारने गडचिरोली येथे दूध विकायला येत असलेल्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. यात सायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना आज (दि.11) सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, सकाळी गडचिरोलीकडून चामोर्शीकडे जात असलेल्या मारुती कंपनीच्या वॅगनार (क्रमांक सीजी 08, एयू 8932) कारने गडचिरोली येथे दूध विकायला येत असलेल्या वाकडी येथील विनायक भोयर यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात भोयर यांना जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला.

सदर कार ही छत्तीसगड राज्यातील असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.