गडचिरोली : लॉयन्स क्लब गडचिरोली तथा स्पंदन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणांतर्गत 13 ते 18 वयोगटातील मुलींसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विविध शाळेतील तसेच महाविद्यालयातील जवळपास 300 मुलींनी सहभाग घेतला.
मॅरेथॅान स्पर्धेची सुरुवात यमुना सेलिब्रेशन लॉन, पोटेगाव रोड गडचिरोली येथून सकाळी 7.30 वाजता झाली. स्पर्धेसाठी 5 किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते. डॉ.मिलिंद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. स्पंदन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि लॅायन्स क्लबचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धेत विद्या विहार विद्यालय मुल येथील तेजस्विनी पवनकुमार कामडे हिने 5000 रुपयांचे प्रथम बक्षीस, लॉयड मेटल्स कोनसरी येथील अंकिता अनिल मडावी हिने 3000 रुपयांचे द्वितीय बक्षीस, तर शिवकन्या क्लब आरमोरी येथील खुशी दिनेश लांबट हिने 2000 रुपयांचे तृतीय बक्षीस पटकावले. कोनसरीतील निकिता अनिल मडावी आणि शिवाजी हायस्कूल गडचिरोलीच्या दिशा प्रभाकर लोनबले यांना प्रत्येकी 1000 रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरणाला डॉ.मिलिंद नरोटे, लॉयन्स क्लबच्या अध्यक्ष मंजुषा मोरे, सचिव नितीन चंबुलवार, झोन चेअरपर्सन दीपक मोरे, कॅबिनेट ऑफिसर सुरेश लडके, नादीर भामानी आणि स्पंदन फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ.पंकज सकिनलावार, डॉ.धम्मदीप बोधेले, डॉ.सौरभ नागुलवार, सतीश चिचघरे आणि रिना चिचघरे, क्रीडा समितीचे मुख्य पंच आशिष नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी लॉयन्स क्लबच्या नीलिमा देशमुख, गिरीश कूकडपवार, किशोर चिलमवार, सुनिल देशमुख, देवानंद कामडी, प्रभू सादमवार, महेश बोरेवार, शेमदेव चापले, मनोज ठाकूर, ज्योती ठाकूर, घिसुलाल काबरा, स्मिता लडके, शालिनी कुमरे, सपना बोरेवार, सुचिता कामडी, परवीन भामानी, वंदना चापले, सविता सादमवार, संध्या चिलमवार आदि लॉयन सदस्य तसेच कारवाफा पाटबंधारे उपविभाग कार्यालयीन चेलमेलवार, साईनाथ कुकड़कर, तुलसीदास मेश्राम, सपना शेट्टे आदी कर्मचारी उपस्थित होते.