गडचिरोली : यावर्षी 12 जुलैपर्यंत बरसलेल्या पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत जास्त आहे. 1 जून ते 12 जुलैपर्यंत जिल्ह्यात 376.5 मिमी पाऊस बरसणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 469.5 मिमी, म्हणजे 124 टक्के पाऊस झाला आहे. त्यात सर्वाधिक 662 मिमी पाऊस (166.5 टक्के) देसाईगंज तालुक्यात बरसला, तर सर्वात कमी 130.8 मिमी सिरोंचा तालुक्यात झाला असून त्याची टक्केवारी अवघी 41.2 टक्के आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

पावसाचे प्रमाण यावर्षी जास्त दिसत असले तरीही तो नियमित नाही. मे महिन्याच्या अखेरीस झालेला मान्सूनपूर्व पाऊस फारसा कामाचा नव्हता. मात्र जून महिन्यात धानाच्या रोपांना (पऱ्ह्यांना) पाण्याची आवश्यकता असताना पावसाने दडी मारली होती. आता जुलै महिन्याच्या सुरूवातीला आधीचा बॅकलॅाग भरून काढत बरसला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पिकांना नुकसानकारक ठरला आहे.
जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये 1 जून ते 12 जुलै दरम्यान झालेला पाऊस आणि सरासरीच्या तुलनेत त्याची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.
गडचिरोली 416 मिमी (94.6 टक्के), धानोरा 572.5 मिमी (121.8 टक्के), देसाईगंज 662 मिमी (166.5 टक्के), आरमोरी 439.3 मिमी (121.3 टक्के), कुरखेडा 643.9 मिमी (145.5 टक्के), कोरची 627.4 मिमी (140.9 टक्के), चामोर्शी 353.3 मिमी (122.2 टक्के), मुलचेरा 398.8 मिमी (106.1 टक्के), अहेरी 350.8 मिमी (92.2 मिमी), सिरोंचा 130.8 मिमी (41.2 टक्के), एटापल्ली 480.4 मिमी (114.2 टक्के), भामरागड 559.7 मिमी (144 टक्के)